Bank of india
Name: LATE SHRI HARIBHAU DESAI MULTIPURPOSE FOUNDATION
Contact WhatsApp: 7276003232
Email: ngolshdmfm@gmail.com
Our Donors
कै. श्री हरिभाऊ देसाई फाउंडेशन
इसवी सन 1919 महामारीनंतर च्या सुमारास महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत, कोल्हापूर जिल्हा भुदरगड तालुक्यातील पश्चिम भागात पसरलेल्या सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीत वसलेले मानी हे गाव.
1950 च्या सुमरास ,दरम्यान अतिदुर्गम भागात वाहतुकीची दळणवळणाची कोणतीही सोय नव्हती. आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन खेडोपाडी पोहोचत नव्हते. शंभर टक्के निसर्गावर अवलंबून असलेले पावसाळ्याच्या दिवसात उत्तरेस वेदगंगा नदीला तर पूर्वेस थोरला ओहळ, पश्चिमेस गायर ओहळ व दक्षिणेस शिवापूर आंबोली पर्यंत पसरलेले सह्याद्री पर्वत रांगेतील घनदाट जंगल आहे.
अशा पद्धतीने तीनही बाजूंना पावसाळ्यात पाणी प्रचंड प्रमाणात असायचे कारण मौनी सागर जलाशय झाले नव्हते. कारणाने नदी ओढे कायमस्वरूपी पात्राच्या बाहेर असायचे,चार महिने पावसाळ्यात बाहेरच्या जगाशी कोणता संपर्क होत नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीत मानीगाव आपले अस्तित्व टिकून राहिले. अशा वेळी गावातील कै. श्री हरिभाऊ देवाबा देसाई या गावात जन्माला आले.पूर्ण आयुष्य मोहिते सरकार यांच्या गाई जंगलात राखून आपला उदरनिर्वाह केला.शिक्षणाची कोणतीही सोय नव्हती सर्व गाव रामभरोसे, तसेच पंचक्रोशी देखील रामभरोशे जगत होती. बाजारहाट लागणारे उपजीविकेचे साधने दुकानवाडी घोटघे येथून कोकणातून घाटमाथ्यावर घेऊन यायला लागे. जवळ बाजारपेठ नव्हती पायी चालत जायचं संध्याकाळी परत बाजार घेऊन रात्री यायचं, अशा पद्धतीचे जीवन चित्र होतं.
तर त्या प्रतिकूल परिस्थितीत हरिभाऊ देसाई यांनी कायम गाईन सोबत जंगलात वास्तव्य करत असल्यामुळे, जंगलातील वनौषधी शोधून काढून त्यांचा उपयोग जनावरे व माणसे आजार मुक्त करण्यासाठी प्रयत्नशिल राहिले. त्यावेळी निशुल्क सेवा केली. भागात कोणी आजारी असेल तर किंवा जनावर आजारी असेल तर ते स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्याला आयुर्वेदिक झाडपाल्याची औषध देत असतं. अशा पद्धतीचे आयुष्यभर निशुल्क लोकसेवा करून समाजासाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केला होता. त्यांचाच वसा धरून त्यांचा मोठा मुलगा कै.श्री वामन हरीभाऊ देसाई यांनी देखील आयुर्वेदाचा उपयोग करून अनेक लोकांना जीवदान दिले तर सध्या श्री. यशवंत हरिभाऊ देसाई यांनी देखील वयाच्या 65 वर्षापर्यंत आयुर्वेदाचा वसा सांभाळून अगणित गरजू नागरिकांना औषधोपचार देत आहेत.
अशाच पद्धतीचा कै. हरिभाऊ देसाई यांचा सामाजिक वसा सांभाळण्यासाठी श्री. कै हरिभाऊ देसाई यांचे नातू श्री हरिश्चंद्र यशवांत देसाई यांनी 2007 रोजी कै. हरिभाऊ देसाई फाउंडेशनचि निर्मिती करून सुरुवात करत सामाजिक दुर्बल,गरजू व्यकी पर्यन्त पोहचून शैक्षणिक साहित्य,वस्त्रदान अभियान, सेंद्रिय शेती प्रसार, गोशाळा,रक्तदान शिबिर वृक्ष लागवड, CSC ( कॉमन सर्व्हिस सेंटर )इत्यादी.अशा पद्धतीचे उपक्रम राबवत आहे. कै.श्री.हरिभाऊ देसाई फाउंडेशन बऱ्याच सामाजिक घटकात काम करत असून संस्थेची पुढील धोरण तालुक्यातील गरजू वृद्ध लोक, ज्यांच्या उतारकाळात त्यांना सुश्रुशीची गरज असते अशांसाठी वृद्धाश्रम चालू करण्यासाठी चे मानस असून त्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. त्या निमित्ताने सदरची वेबसाईट चालू करून आपल्यापर्यंत पोहोचण्याचे सोशल मीडयाद्वारे साधन असले कारणाने कृपया सढळ हाताने मदत करावी ही नम्र विनंती .धन्यवाद.🙏🏻